
आयोध्या ( Aayodhya) दौऱ्यावरून येताच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ” शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी मशीद पाडण्यात काडी मात्र संबंध नाही,” असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; पाहा Video
फक्त एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना देखील त्यांनी खुले आव्हान दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बाबरी मशिदीच्या संदर्भात असलेले नाव पुसण्याचे काम चंद्रकांत पाटील करत आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे आता सरकार मधून बाहेर पडणार का? असा प्रश्न देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.
AK47 बंदूक चक्क पिकांच्या संरक्षणासाठी! वाचा सविस्तर
संपूर्ण देशाला बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांनी केलेला त्याग माहिती आहे. यावरच भारतीय जनता पार्टी हा पक्ष तयार झाला आहे. हिंदुत्वाची मशाल पेटत राहावी व आयोध्येच्या संदर्भात झालेल्या घटनांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे काम केले आहे. हे काम संपूर्ण देशाला माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!