ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सगळीकडे खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती हा पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. माहितीनुसार, राऊतांना काल रात्री 9 वाजता त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, आता प्रकरणावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ
याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा हटवली. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलगा एक षडयंत्र रचतो. एका गुंडाला हाताशी धरून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचतो. त्याची माहिती दिल्यानंतर मी स्टंट करतो असं राज्याचे गृहमंत्री म्हणतात अशी जोरदार टीका यावेळी राऊतांनी सरकारवर केली आहे.
“मला माफ करा, मी माझ्या वेशभूषेत बदल करणार…” उर्फीने घेतला मोठा निर्णय
त्याचबरोबर राऊत बोलताना पुढे म्हणाले, मागच्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिष्णोईच्या गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आता त्याच गँगने मला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे धमकी आल्यानंतर मी लगेचच पोलिसांना कळवलं आहे. उद्या मी कळवलं नाही असं होऊ नाही म्हणून मी पोलिसांना लगेच कळवल्याचं राऊत यावेळी म्हणाले आहेत.
सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी