
मुंबई : शिवसेना नेते संजकुमार राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी वाढ करण्यात आली आहे.5 सप्टेंबर पर्यंत त्यांना आर्थर रोड (orthar road) तुरुंगात राहावं लागणारं आहे.ईडीला संजय राऊत यांच्या बाबत काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याने राऊत यांना कोर्टाकडून (court) दिलासा मिळू शकला .5 सप्टेंबर रोजीच त्यांच्या पुढील सुनावणीवर निर्णय होणार आहे. तेव्हाच ठरलं की संजय राऊत यांना जेल की बेल.
Mohit Sonkar : गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स करताना सापडला भाजप नेता! कुटुंबीयांनी पाहिलं अन्…
आज कोर्टात हजर करण्यापूर्वी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, आज राऊत यांनी कोर्टात कोणतीही तक्रार केली नसल्याचं सांगण्यात आलं. कारण मागच्यावेळी राऊत यांनी कोर्टातील गैरसोयींची तक्रार केली होती. त्यांना कोंदट रुममध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी श्वास घेण्यास त्रास होतो असे राऊत म्हंटले होते.
Devendr Fadanvis-Ajit Pawar: मेटेंच्या अपघातावर फडणवीस आणि अजित पवारांनी केली ‘ ही’ चर्चा
नेमक काय आहे पत्राचाळ प्रकरण
गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला होता. 2008 साली हा पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. गुरूआशिष बांधकाम कंपनी, म्हाडा आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला. या करारामध्ये 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरे दिली जातील आणि राहिलेल्या उर्वरित भागामध्ये म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आले आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1 हजार 34 कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली.पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली.