संजय राऊतांचे बेळगाव कोर्टाच्या समन्सला उत्तर; म्हणाले, “मी उपस्थित राहणार नाही…”

Sanjay Raut's reply to Belgaum court summons; Said, “I will not attend…”

संजय राऊतांनी (Sanjay Raut) ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर कोर्टाने बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे देखील आदेश दिले आहेत. आता यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत स्पष्टच म्हणाले, “आपण सुनावणीला जाणार नाही”.

मोठी बातमी! गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होणार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळूर येथे एक खळबळजनक विधान केलं होत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत यावर आम्ही विचार करतोय असे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे आता कर्नाटक आणि महाराष्ट्र असा वाद पेटला आहे. आणि यामध्येच आता संजय राऊतांना समन्स मिळाल्याने राज्याच्या राजकरणात चर्चांना उधान आले आहे.

मुलीच्या जन्मानंतर आलियाला पाहून चाहते खुश; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजून देखील राजभवनातच आहेत. सरकार देखील अजून गप्प बसलंय, महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पिकांसाठी लागणारी कीटकनाशके आता थेट बांधावर मिळणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *