‘जनतेच्या शापामुळे समृद्धी महामार्गावर अपघात झाला’ संजय राऊत यांचा राज्य सरकारवर धक्कादायक आरोप

Raut

समृद्धी महामार्गावरील (Samriddhi highway) अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. या महामार्गावर सतत अपघात होत असून नुकत्याच झालेल्या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे (Samriddhi highway accident) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. या अपघातानंतर राज्य सरकारवर (State Govt) टीका केली जात आहे. (Latest Marathi News)

‘मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करतात’; ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

‘समृद्धी महामार्गावर मागील वर्षभरापासून सतत अपघात होत असून ही खूप दुर्दैवी बाब आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग असल्याने त्यावर सतत अपघात आहेत’, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकांच्या मनमानी करून त्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

बिग ब्रेकिंग! राजकीय हालचालींना वेग, शिवसेनेतील ‘या’ बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू

‘दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. अनेकांचे बळी जात आहेत. या महामार्गावर वेगाची मर्यादा घालण्यात यावी अशी मागणी आम्ही अनेकदा केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारने लोकांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या आहेत. हा महामार्ग बनत असताना खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे’, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

नागरिकांनो.. घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *