ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडेल आहेत. पत्रकारांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल त्यांना प्रश्न विचारला होता. श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल बोलताना ते बाजूला थुंकले. त्यामुळे संजय राऊतांवर शिंदे गटाकडून टीकांचा भाडीमार होत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी देखील संजय राऊत यांना सल्ला दिला.
ब्रेकिंग! पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या कृतीवर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात संस्कृती आणि परंपरा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसा काम करतो, हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगावे. मात्र पुन्हा एकदा संजय राऊतांची अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलताना जीभ घसरली आहे.
गुंडाळलेला मृतदेहांचा ढीग, जखमींवर गॅलरीत उपचार सुरू; रेल्वे अपघातानंतरचे दृश्य पाहून बसेल धक्का
अजित पवार यांच्या प्रतिक्रियावर बोलताना संजय राऊत म्हणाले, धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकलेले चांगले. आम्ही भोगत आहोत. सगळे भोगूनही, आम्ही कोठे पळालो नाही. आम्ही पक्षासोबत ठामपणे उभा आहोत. ज्यांची जळते, त्यांनाच कळते. संकटे येतात. त्यामुळे आम्ही पक्ष बदलण्याचा किंवा भाजपासोबत सूत जुळवण्याचा विचार करत नाहीत, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली.
Gmail वरील नको त्या Emails मुळे झालाय त्रस्त? जाणून घ्या सर्व ईमेल एकत्र डिलीट करण्याचं टेक्निक
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. त्यामुळे मी चुकलो म्हणून माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असे असेल तर देशातील १३० कोटी जनता रोज कोठे ना कुठे थुंकते. मी बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. त्यांची नावे घेतल्यावर माझी जीभ चावली. त्यामुळे मी थुंकलो. माझे संतुलन चांगले आहे. माझ्यामुळे अनेकांचे संतुलन ढासळले आहे, असा टोला त्यांनी लगावला.