Sanjay Raut । संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! दाखल झाली निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमकं प्रकारण काय?

Sanjay Raut

Sanjay Raut । खासदार संजय राऊत हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. नुकतेच त्यांनी एक विधान केले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे. या विधानामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगामध्ये (Election Commission) तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येणार, शरद पवारांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तुलना औरंगजेबाशी केली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता (Vivekananda Gupta) यांनी संजय राऊत यांच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी संजय राऊतांना नोटीस येऊन त्यांची चौकशी होऊ शकते.

BJP । भाजपचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. याप्रकरणी त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. पण या दोन्ही नेत्यांच्या विधानाचा महायुतीने कडाडून विरोध केलेला आहे. त्यामुळे आता या नेत्यांवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Lok Sabha Elections 2024 । रामराजे निंबाळकर यांचा भाजपला गंभीर इशारा; म्हणाले, “माढ्यातील एक खासदार पडला, तर…”

Spread the love