भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राहुल गांधी यांच्यावर टीका देखील होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा मोठा इशारा दिला आहे. राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल असे बोलत असतील तर महाविकास आघाडी मध्ये फूट पडू शकते. असा इशारा संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे.
जिममध्ये व्यायाम करताना मृत्यूचं प्रमाण वाढतंय; अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा केलं मोठं वक्तव्य
“सावरकर किती वीर होते. इंग्रजांकडून पेन्शन घेत होते. काँग्रेसच्या विरोधात इंग्रजांसोबत काम करत होते. सावरकर यांनी पत्र लिहिले आणि सावरकर इंग्रजांचं काम करू लागले” अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. यावरून विरोधकांकडून महाविकास आघाडीवर देखील टीका केली जात आहे. म्हणून संजय राऊत पुढे काँग्रेस विरोधात पुढे सरसावले आहेत.
धक्कादायक! समुद्रात वाहून गेली पाच मुले
महाविकास आघाडीची मोट बांधण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या साथीने महाविकास आघाडीची स्थापना केली. आता याच संजय राऊतांनी महाविकास आघाडीत फूट पडण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
चंपक चाचांचा अपघात; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे चित्रीकरण थांबले
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra) ही विधायक हेतूने सुरू केली असून महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अशा विषयांवर ही यात्रा सुरू आहे. निव्वळ याच कारणामुळे भारत जोडो यात्रेला देशभरात मोठे समर्थन मिळत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या यात्रेत सावरकरांचा विषय काढण्याची गरज न्हवती. असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
कुठलाच क्लास न लावताच झाली आयएएस अधिकारी; वाचा कृषीकन्येची यशोगाथा