Sanjay Shirsat । येत्या 26 जानेवारीला मुंबईत (Mumbai) मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे. मराठा समाजाने मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न देखील केले गेले. मात्र मनोज जरांगे पाटील ऐकून घेण्यास तयार नाहीत. काही झालं तरी मुंबईला येणार आणि आरक्षण घेणार अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आता त्यांच्या या भूमिकेवर सत्ताधारी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होईल अशी माहिती संजय शिरसाठ यांनी दिली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यावर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शिरसाठ यांनी यावेळी मराठा बांधवांना आपल्या आंदोलनाचा इतर समाजकटांनी फायदा घेऊ नये. यासाठी काळजी घेण्याच आवाहन देखील केल आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे अहोरात्र काम सुरू आहे. त्यांचं काम तसंच पुढे चालत राहणार आहे. आंदोलकांना विनंती आहे की इतर लोक आपल्या आंदोलनाचा फायदा घेणार नाही त्याची काळजी घ्यावी. असे संजय शिरसाठ म्हणाले आहेत.
Rashmika Mandanna । ब्रेकिंग न्यूज! रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणात मुख्य आरोपीला अटक