मुंबई : आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदें यांना पाठिंबा दिला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणतेही स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामध्येच आता शिरसाटांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे.
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विटवरवरून शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की “महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब” पण , काही वेळांनंतर लगेचच त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे संजय शिरसाट आता परत उद्धव ठाकरेंकडे जाणार की काय? अशा चर्चा सुरु आहेत.
ट्विट डिलीट केल्यांनतर शिरसाट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरेंनी कायम कुटुंबप्रमुख मनात आलो आहोत. आज जरी आमच्यात भांडण झाले असले तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. फक्त विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर आणि ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले”,