Sanjay Shirsath । “हिम्मत असेल तर अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा” संजय शिरसाठ यांचे मोठे वक्तव्य

"If you dare show Ajit Pawar as a traitor" Sanjay Shirasath's big statement

Sanjay Shirsath । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल आणि यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले. यानंतर हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर कायम गद्दार म्हणत टीका करण्यात आली होती.

Samsung Galaxy A54 5G । वाचतील हजारो रुपये! सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळेल 25,500 रुपयांपर्यंत सवलत

त्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत देखील शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. मात्र आत्तापर्यंत अजित पवार गटाला शरद पवार गटाकडून कोणीही गद्दार म्हटलं नाही. यावरूनच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान दिल आहे.

Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्गावर 8 महिन्यांमध्ये 729 अपघात! अहवालात धक्कादायक माहिती समोर

ठाकरे गटावर टीका करत संजय शिरसाठ म्हणाले, “आम्हाला गद्दार म्हणता आता अजित दादांना गद्दार म्हणून दाखवा, तुमच्या मध्ये हिम्मत आहे का? असा प्रश्न देखील संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर स्वतःचे घर भरण्यासाठी यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार विकले. त्यांनी काय लपवले?, दडवले काही दिवसानंतर बाहेर येईल. असे देखील संजय शिरसाठ म्हणाले आहेत.

Sharad Pawar । राज्यावर दुष्काळाचे सावट! शरद पवारांनी दिल्या सरकारला महत्त्वाच्या सूचना

Spread the love