राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. (Sharad Pawar and Uddhav Thackeray met at Silver Oak.) या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार म्हणाले, “माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर भाजपसोबत जाण्यासाठी दबाव आणला जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे सांगितलं आहे असा दावा राऊतांनी केलाय.
२२ वर्षीय साताऱ्याचा ‘वीरपुत्र’ देशासाठी शहीद; पाच दिवसांपूर्वीच गावी येऊन गेला होता…
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. आता यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde group MLA Sanjay Shirsat) यांनी देखील भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती आहे,” असं शिरसाट म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
धक्कादायक! पुण्यात भररस्त्यात चालू इलेक्ट्रिक कारने घेतला पेट
त्याचबरोबर शिरसाट पुढे म्हणाले, “ शरद पवारांच्या मूक संमतीमुले राष्ट्रवादीमधील काही लोक फुटतील. अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केले असं ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही,” असा दावा देखील त्यांनी केलाय.
‘जे भाजपामध्ये जातील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय’ शरद पवार स्पष्टच बोलले