बागेश्वर बाबा मागच्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहेत. आता त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केले आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची असे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ब्रेकिंग! आरोग्यमंत्र्यावर भरसभेत अज्ञाताने झाडल्या गोळ्या
बागेश्वर बाबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
लव जिहादच्या नावाखाली समाजामध्ये विष पेरण्याच काम सुरू – अजित पवार
नेमके कोण आहेत बागेश्वर बाबा?
बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) हे छतरपूर (Chhatrapur) जिल्ह्यातील आहेत. येथील बागेश्वर धाम हनुमान या मंदिराचे पुजारी व कथावाचक म्हणून त्यांना ओळखले जात होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shatri) हे त्यांचे मूळ नाव आहे. छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला असून त्यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले होते. बागेश्वर बाबांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु, त्या पुढील शिक्षणासाठी बाबांना वृंदावन येथे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे एक हजार रुपये न्हवते. म्हणून बागेश्वर बाबांनी शिक्षण सोडून वडिलांसोबत कथा वाचण्यास सुरुवात केली.
हिंदू जन आक्रोश मोर्चावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…