Santosh Deshmukh | सर्वात मोठी बातमी! अखेर सुदर्शन घुलेने कबूल केले, संतोष देशमुख हत्येच्या मागे कराडचा हात!

Sudarshan ghule

Santosh Deshmukh | बीड येथील विशेष मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सखोल युक्तीवाद सादर करत हत्येच्या मागील घटनेचं संपूर्ण तपशील न्यायालयासमोर मांडला.

Devendra Fadnavis । राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

हत्येचा कट आणि धमकी 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे या तिघांनी मस्साजोग येथील आवाजा कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून सुरक्षा रक्षकास शिवीगाळ केली आणि मारहाण केली. यावेळी, सुदर्शन घुलेने कंपनीकडून दोन कोटी रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली. या वादाच्या सोडवणुकीसाठी सरपंच संतोष देशमुख आणि काही स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. मात्र, सुदर्शनने संतोष देशमुख यांनाही धमकावले.

Blue Drum Case । निळ्या ड्रमने निर्माण केली दहशत, सौरभ हत्याकांडामुळे देशभर निळ्या ड्रमचीच चर्चा

हत्येचा कट – हॉटेलमध्ये बैठक 7 डिसेंबरच्या रात्री सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला आणि घडलेल्या घटनांचा तपशील सांगितला. त्यावर कराडने “अडथळा आणणाऱ्यांना संपवा” असं सांगितल्याचा खुलासा झाला. 8 डिसेंबरला रात्री, केजच्या तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार एकत्र बसले होते. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला गेला.

Crime News । भयानक! सावत्र आईसह तीन भावंडं आणि मित्राची निर्घृण हत्या! अखेर १७ वर्षांनी आरोपीला पोलिसांनी पकडले

अपहरण आणि क्रूर हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे, कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशन्स गोळा केले आहेत, ज्यामुळे ही हत्या ठोस नियोजनाच्या अंतर्गत केल्याचे स्पष्ट होत आहे.

Supriya Sule । जयकुमार गोरे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा घणाघात, सरकारवर गंभीर आरोप

उज्ज्वल निकम यांनी कोर्टात यावर साक्षीदारांच्या जबाब आणि पुरावे सादर केले आहेत, ज्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Spread the love