Santosh Deshmukh case । संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीला मोठं आव्हान, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता

Valmik Karad case

Santosh Deshmukh case । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 25 दिवस उलटून गेले तरीही तीन मारेकरी फरार आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी बीड पोलीस आणि सीआयडीने एकूण 9 पथके तयार केली असून जवळपास 150 लोकांचा समावेश आहे. त्यानंतरही मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर तीन आरोपींचा शोध घेण्यात सीआयडीला यश आलेले नाही.

Valmik Karad case । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली; ऑक्सिजन लावले

त्यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक मारेकरी, सुदर्शन घुले, देशाबाहेर पळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुदर्शन घुले हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि तो यापूर्वी नेपाळला गेला होता. त्यामुळे सीआयडीची पथके सुदर्शन घुलेचा शोध घेत आहेत. त्याने नेपाळमध्ये लपल्याची शक्यता असून, त्याचा शोध घेतला जात आहे. सीआयडीकडून देशाबाहेर पळाल्याबद्दल देखील तपास सुरु आहे.

LPG Gas Cylinder Price Cut Today | खुशखबर! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात

संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात काही संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. खास करून, वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता, आणि त्यानंतर सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी याबाबत नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या प्रकरणाचा अधिक खोलात तपास होऊ शकेल. सीआयडीकडून तपासाचा फास आवळला जात असून, फरार आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Sharad Pawar । शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार; बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Spread the love