अनेक मोठे मोठे सेलेब्रिटी बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांमुळे अडचणीत येतात. भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) देखील त्याच्या चाहत्यांमुळे अडचणीत आला आहे. सेल्फी देण्यास नकार दिल्याने त्याच्याशी काही चाहत्यांनी हुज्जत घातली आहे. यांनतर न्यायालयाने आरोपी सपना गिलला पोलीस कोठडी सुनावली. मात्र सपना गिलला जामीन देखील मंजूर झाला आहे.
“तोपर्यंत मागे हटणार नाही, जोपर्यंत…”, एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम
सपना गिलला जामीन मिळताच तिने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी सपना गिल म्हणाली, “पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी मला बेसबॉलने मारहाण केली. त्याचबरोबर माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला चापटही मारली,” असे गंभीर आरोप सपनाने केले आहे. त्यामुळे आता क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करा; आदित्य ठाकरेंचे चिंचवड मध्ये आवाहन
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर पृथ्वी शॉने सेल्फी (selfi) घेण्यास नकार दिल्यामुळे त्याचा आपल्या चाहत्यांसोबत वाद झाला.
संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात; देवेंद्र फडणवीस यांची संतप्त टीका