बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकताच सिनेसृष्टीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात सारासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. सारा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
कोल्हापुर प्रकरणावरून शरद पवारांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
सारा सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सारा कधी तिच्या पोस्टमुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत येते. माध्यमातील वृत्तनुसार, अभिनेत्री सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सारा किंवा शुभमने अद्यापही या सर्व प्रकारणावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. नुकतीच साराने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
WTC मॅचच्या पहिल्याच दिवशी ‘हे’ बडे प्लेयर भिडले! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आजी शर्मिला टागोर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत तू सुद्धा क्रिकेटरशी लग्न करशील का? या प्रश्नाचे उत्तर देताना सारा म्हणाली की, “समोरची ती व्यक्ती कोण आहे याने मला फरक पडत नाही. मग ती अभिनेता, क्रिकेटर , व्यावसायिक किंवा डॉक्टर असेल तरीही. पण मानसिक आणि बौद्धिक पातळीवर माझ्याशी जुळून घेणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही ते करू शकत असला तर चांगलीच गोष्ट आहे. एखादी व्यक्ती कोण आहे किंवा काय करते यापेक्षा माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे.”
मुंबईच्या वसतिगृहातील तरुणीसोबत घडलेल्या प्रकराबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…