Satara Accident । पुणे–बंगळूर महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 3 जागीच ठार

Satara News

Satara Accident । अपघाताच्या घटना काही कमी व्हायचं नाव घेत नाही सतत कुठे ना कुठे दररोज अपघात होत असतात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा वन्यप्राणी आडवे येऊन, टायर फुटून, अशा अनेक वेगवेगळ्या कारणाने अपघात होत असतात. सध्या देखील पुणे–बंगळूर महामार्गावरील पाचवड फाटा या ठिकाणी एक चारचाकी गाडी आणि ट्रक यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Maratha Reservation । “छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे एकाच बाजारातले,” मनोज जरांगेंची जहरी टीका

हा अपघात आज शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये एक महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर ठार झालेल्या मधील एकाचा पोलीस दलात समावेश असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Maratha Reservation । आज इतिहास घडणार… आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा; सभेसाठी तयारी कशी?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे बंगळूर महामार्गावर कराड जवळील पाचवड फाटा या ठिकाणी चार चाकी गाडी कोल्हापूर कडून मुंबईकडे चालली होती. याचवेळी चार चाकीने ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली आणि या भीषण धडकेत चारचाकी गाडीचा पुढील भाग हा ट्रकच्या पाठीमागील भागात घुसला यामुळे चार चाकी मधील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Udayanraje Bhosale । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार?

Spread the love