Satara Accident News । साताऱ्यात ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

Satara Accident News

Satara Accident News । अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याआहेत. रस्ते कितीही चांगले झाले असले तरी अपघात हे दिवसेंदिवस वाढतच असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील सातारा जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Breaking News | अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रक मधील एक जण जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती तेथील स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Manoj Jarange Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावली; डॉक्टरांकडून तपासणी सुरु

याबाबत अधिकची माहिती अशी की, ट्रक भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने येत होता आणि रात्रीच्या सुमारास या ट्रकने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टर मधील बसलेल्या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलाचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ट्रक मधील एक जण जखमी असून सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Viral Video । नवरदेव घोड्यावर बसला होता, काही वेळातच लग्न लागणार होत मात्र घोड्याचं कृत्य पाहून सर्वच झाले थक्क; पाहा व्हिडीओ

Spread the love