Satara News । साताऱ्यात धक्कादायक प्रकार! गल्लीतल्या शौचालयात मध्यरात्री दिसली अघोरी पाहुणी; दृश्य पाहून बायका तापाने फणफणल्या

Satara News

Satara News । आपण जर रात्री अचानक शौचालयासाठी उठलो आणि आपल्यासमोर एखादं भयभीत चित्र उभं राहिलं तर? आपली काय परिस्थिती असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. सध्या देखील सातारा शहरातील कैकाड गल्ली या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यातील कैकाडी या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयात एक भयावह पुतळा ठेवण्यात आला. तो पुतळा पाहून गल्लीतील दोन बायका चांगल्याच घाबरल्या आहेत. (Satara Prank )

Manik Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडी आणि बंगल्यावर अज्ञातांनी केला हल्ला

कैकाड गल्ली या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास दोन बायका शौचालयासाठी गेल्या यावेळी. शौचालयातील भयावह पुतळा पाहून त्यांच्या पोटातील कळ थेट छातीत गेली. या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती. त्याचबरोबर त्याच्या डोक्यावर पदरही होता आणि त्या पुतळ्याला मेकपही करण्यात आला होता. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अतिशय भयानक दिसत होता. त्यामुळे या महिला चांगल्याच घाबरल्या आणि या परिसरात एकच खळबळ उडाली.

Maharashtra Corona Update । महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सापडले तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण; रिपोर्ट चिंता वाढवणारा

महिलांनी हा पुतळा पाहताच मोठा आरडाओरडा केला यानंतर सर्व गल्ली जागी झाली आणि मग शौचालयात आलेल्या या आघोरी पाहुणीची चौकशी सुरू झाली. यानंतर लोकांनी त्याला दगड मारून पाहिलं मग तो पुतळा असल्याचा समजलं. कोणीतरी हा प्रँक केला असल्याचं समजत आहे. मात्र चेष्टा आणि प्रँक करावं पण त्याला काही मर्यादा असाव्यात. अशा चर्चा सुरू आहेत याचा परिणाम काय होईल हे देखील तपासलं पाहिजे. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी कोणीही अशा प्रकारचे प्रँक करू नयेत असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.

Mumbai Airport Video । मुंबई विमानतळावरील डोसाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा किती आहे किंमत?

आता या साताऱ्याच्या गल्लीमध्ये नेमका प्रँक कोणी केला याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत. लोकांना घाबरवण्याचे उद्योग करणाऱ्यांना पोलिसांनी अशा ठिकाणी फटकवलं पाहिजे की रोज शौचालयाला जाताना त्यांना त्या फटक्यांची आठवण आली पाहिजे. अशी संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

Salman Khan Birthday । एका चित्रपटासाठी सलमान घेतो ‘इतके’ कोटी रुपये, वाचून बसेल धक्का; मात्र तरीही राहतो १ बीएचके फ्लॅटमध्ये, नेमकं कारण काय?

Spread the love