Eknath Shinde। राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. पक्षाने तिकीट नाकारल्याने काही नाराज नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. तर प्रचारसभांदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण आणखी पेटत आहे. (Latest marathi news)
Lok Sabha Election । लोकसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. काल रात्री ते 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचशील हॉटेलमध्ये भेटले. काही नावे काढून त्या लोकांवर कारवाया करण्याबाबत सूचना दिल्या, असल्याची माझ्याकडे माहिती आली आहे. याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.
Maharashtra Politics । माढ्यात फडणवीसांची नवी चाल, मोहिते- पवार गटाला दिला मोठा धक्का
“याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे पंचशील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी आपण मागणी करणार आहे,” असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात तगडी लढत पार पडणार आहे. या ठिकाणी आता कोण बाजी मारतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.