महाराष्ट्रात आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( Maharashtra Budget Session) सुरुवात होत आहे. दरम्यान प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या आमदारांना बजावलेले व्हीप, सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये रंगलेले टिकायुद्ध यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. नाशिक मतदार संघातून नव्यानेच निवडून आलेल्या सत्यजित तांबेचे ( Satyajit Tambe) हे पहिले अधिवेशन असणार आहे.
“अशा व्हीपला आम्ही भीकही घालत नाही”, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची शिंदे गटावर जोरदार टीका
या पार्श्वभूमीवर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले आहेत की, ” यंदाचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन माझ्या आयुष्यतील पहिले अधिवेशन असणार आहे. त्यामुळे शाळेतल्या पहिल्या दिवशी जशा भावना असतात तशा भावना निर्माण झाल्या आहेत. ” यावेळी सत्यजित तांबेनी अधिवेशनात आपण कुठले मुद्दे मांडणार आहोत याबद्दल देखील माहिती दिली आहे.
मोठी बातमी! ठाकरे गटाचे आमदार अडचणीत; सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील शिंदे गटाने व्हीप बजावला
अधिवेशनात उपस्थित करणार हे मुद्दे
1) सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मांडणार
2) सामान्य माणसांच्या समस्या व प्रश्न मांडणार
3) सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन
4) उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न
संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “मंत्रालयाकडंच झाडं लावलं तर भ्रष्टाचाराची प्रकरण…”
आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिल्या अधिवेशनात युवा नेते सत्यजित तांबे युवकांचा आवाज बनून सभागृहात काम करणार असून याबाबत त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. अशी माहिती तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
ह्रता दुर्गुळे ठरली ‘महाराष्ट्राची फेव्हरेट’; ट्रॉफी पाहून म्हणाली…