
महाराष्ट्रात आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( Maharashtra Budget Session) सुरुवात होत आहे. दरम्यान प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या आमदारांना बजावलेले व्हीप, सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये रंगलेले टिकायुद्ध यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. नाशिक मतदार संघातून नव्यानेच निवडून आलेल्या सत्यजित तांबेचे ( Satyajit Tambe) हे पहिले अधिवेशन असणार आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जवळच्या विश्वासू नेत्याने दिला राजीनामा
यावेळी सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना, त्यांनी आपली भावी वाटचाल कशी असेल? यावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या ऑफरवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे म्हणाले, “मी अपक्ष आमदार आहे आणि मी अपक्षच राहणार. पुढील परिस्थितीनुसार जसे प्रश्न उपस्थित होतील त्याप्रमाणे निर्णय घेईल,” असं वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.
अशी दिसते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लेक दिविजा; पाहा PHOTO
तुम्हाला काँग्रेस पक्ष कार्यालयातून फोन वगैरे आले होते का? असा प्रश्न विचारताच सत्यजीत तांबे यांनी उत्तर देणं टाळलं. म्हणाले, “ सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलोय,” अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोबाईल डेटा वाचवण्यासाठी वापरा ‘हा’ स्मार्ट उपाय; बंद करा ‘ही’ सेटिंग