Site icon e लोकहित | Marathi News

राज्याभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

'Savarkar Gaurav Yatra' will be held across the state; Eknath Shinde's big announcement

राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FadnavisDevendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री शिंदेंनी राहुल गांधीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. राहुल गांधींकडून सातत्यानं सावरकरांचा अपमान करण्यात आला. असं म्हणत राहुल गांधीच्या वक्तव्याचा शिंदेंनी निषेध केला.

“गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय…”, भर कार्यक्रमात अजित पवार भडकले

सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकर (Savarkar) व्हायला तेवढा त्याग आणि प्रेम तुमच्यात असायला हवं. तुम्हाला काय देशाबद्दल प्रेम असणार; तुम्ही तर परदेशात जाऊन भारताची निंदा करता. असंही शिंदें यावेळी म्हणाले. यावेळी सावरकरांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेखदेखील शिंदेंनी केला.

धक्कादायक घटना! २ महिन्याच्या चिमुकलीला बहिणींनी टेडी समजून घातली आंघोळ अन् बादलीत पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

अनेक दिवसांनी या वक्तव्यावर विरोधी पक्ष आणि ठाकरेंनी विरोधी दर्शवला. तो विरोध औपचारिकता म्हणून होत आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशी गत विरोधी पक्षाची झाली असल्याचं शिंदे म्हणाले. त्याचबरोबर राज्यभरात सावरकर गौरव जनता यात्रा सुरु करणारअसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सावरकर होण्याची तुमची लायकी नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love
Exit mobile version