Site icon e लोकहित | Marathi News

Samsung Galaxy A54 5G । वाचतील हजारो रुपये! सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळेल 25,500 रुपयांपर्यंत सवलत

Save thousands of rupees! Samsung's 'Ya' 5G phone will get a discount of up to Rs 25,500

Samsung Galaxy A54 5G । अलीकडच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत फोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. याच्या मदतीने चुटकीसरशी कामे होऊ लागली आहेत. भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung सतत आपले शानदार फोन (Samsung Smartphone) लाँच करत असते. त्यापैकी काही फोनच्या किमती जास्त असतात तर काहींच्या किमती कमी असतात. (Latest Marathi News)

Sharad Pawar । राज्यावर दुष्काळाचे सावट! शरद पवारांनी दिल्या सरकारला महत्त्वाच्या सूचना

काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपला Galaxy A54 5G हा स्मार्टफोन (Galaxy A54 5G) लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 40,999 रुपये आहे. परंतु जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. ज्याचा लाभ घेऊन तुम्ही हजारोंची बचत करू शकता. खूप कमी किमतीत शानदार फीचर्स असणारा तुम्हाला स्मार्टफोन करता येईल. जाणून घ्या ऑफर आणि किंमत. (Samsung Galaxy A54 5G Offer)

Urfi Javed Viral Video । उर्फी जावेदचा देसी लुक अन् चाहते घायाळ, साडीवर दिसली अभिनेत्री ग्लॅमरस लुकमध्ये

जाणून घ्या संपूर्ण ऑफर

जर किमतीचा विचार करायचे झाले तर Samsung च्या या स्मार्टफोनची किंमत 40,999 रुपये (Samsung Galaxy A54 5G Price) इतकी आहे. या शानदार ऑफरमध्ये तुम्ही हा फोन एकूण 22,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह खरेदी करू शकता, परंतु त्यासाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असावा. तुम्हाला या स्मार्टफोनवर बँक डिस्काउंट मिळेल त्यामुळे फोन 3,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. हे लक्षात ठेवा की या सवलतीसाठी, तुम्हाला ICICI किंवा SBI कार्डने पैसे द्यावे लागणार आहेत.

Government Scheme । शेतकरी बनणार उद्योजक! सरकार देत आहे 50 लाख रुपये, असा घ्या लाभ

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

हा 5G स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. यात तुम्हाला एक शक्तिशाली ऑक्टा-कोर चिपसेट मिळेल जी 1 टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह मजबूत डिस्प्ले मिळत असून त्याचा आकार 6.4 इंच इतका आहे. तर फोटोग्राफीसाठी मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Onion Rate । कांदा निर्यातीवरून शेतकरी संघटना आक्रमक! चक्काजाम आंदोलन करत केली ‘ही’ मागणी

इतकेच नाही तर वापरकर्त्यांसाठी कंपनीकडून यात 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल कॅमेरा सोबत 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल आणि फोनची बॅटरी 5000mAh ची आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आत्ताच या संधीचा लाभ घ्या.

Samrtphone Charging | तुम्हीही स्मार्टफोन 100% चार्ज करताय? तर थांबा, ही बातमी एकदा वाचाच

Spread the love
Exit mobile version