Sayaji Shinde | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

Sayaji Shinde

Sayaji Shinde | मागच्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी धडपडत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट घेतली. जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Sayaji Shinde met Manoj Jarange Patil) या भेटीनंतर सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

Pune Crime । पुणे हादरलं! जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने केले वार

यावेळी बोलताना आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर मुंबईत 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. यावेळी या आंदोलनाला सहभागी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी सयाजी शिंदे यांना विचारला यावर देखील सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू यांना सर्वात मोठा धक्का

काय म्हणाले सयाजी शिंदे?

समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. या आरक्षणासंदर्भात कोणीतरी आवाज उठवणं हे गरजेचं होतं आणि आता तो आवाज जरांगे पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आंतरवाली सराटी या ठिकाणी आलो आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.

Manoj Jarange । मनोज जरांगे यांच्या घरात कुणबी नोंदी नाहीत; धक्कादायक माहिती समोर

त्याचबरोबर माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो आणि त्यांना भेटलो आणि चहा पाणी घेतलं असं सयाजी शिंदे स्पष्ट म्हणाले आहेत. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना मुंबईत होणाऱ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत ते म्हणाले, प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे असं नसतं. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं देखील खूप महत्त्वाच असतं.

Viral Video । विद्यार्थ्यासोबतच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेन दिल उत्तर, म्हणाली…

Spread the love