माणसाला एखाद्या गोष्टीची झिंग चढली तर त्यामध्ये तो प्रचंड चुका करतो. अगदी असाच काहीसा प्रकार उत्तराखंड मधीक हरिद्वार येथे घडला आहे. येथील एका व्यक्तीने ड्रीम 11 या गेममध्ये 1 कोटी 35 लाख रुपये जिंकले. यामुळे त्याला प्रचंड आनंद झाला. या आनंदातच त्याने भरपूर मद्यपान केले.
अन् गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी हातात घेतली काठी, पुढे काय झाले हे वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
ही व्यक्ती इथेच थांबली नाही तर नशेत आल्यावर या व्यक्तीने (Drunked Man) गोंधळ घालायला सुरुवात केली. दरम्यान घटनास्थळी पोलीस येताच या व्यक्तीने पोलिसांसोबत देखील गैरवर्तन केले. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांचा भाऊ आहे म्हणत, त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची धमकी देखील दिली.
मोठी बातमी! अदानींची शेअर मार्केट मधून हाकलपट्टी; वाढते नुकसान पाहून NSE ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महेश सिंग धामी असे या व्यक्तीचे नाव असून शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. महेश धामी हे हरिद्वार ( Haridwar) मधील सिडकूल (Sidkul) परिसरात राहणारे आहेत.
ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी येणार नवा पाहुणा; लवकरच होणार आई-बाबा
पोलिसांनी महेश यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले तरीही त्यांचा राडा सुरूच होता. कोतवाल रमेश सिंह तंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांना शांतता भंगाच्या कलमाखाली दंड ठोठावण्यात आला आहे.