UGC on Reservation । मोठी बातमी! विद्यापीठातील एससी, एसटी, ओबीसी आरक्षण रद्द होणार? केंद्रानं दिलं स्पष्टीकरण

UGC on Reservation

UGC on Reservation । नवी दिल्ली : राज्यात आता पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आता विद्यापीठातील एससी, एसटी, ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगानं आणला आहे. (Latest marathi news)

Accident News । महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

सरकारनं (Central Govt) आता यावरुन स्पष्टीकरण दिले आहे. विद्यापीठांमध्ये एसीसी, एसटी, ओबीसींसाठी आरक्षित असणारी पदं अनारक्षित केली जाऊ शकत नाहीत, केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये (शिक्षकांसाठी आरक्षण) अधिनियम २०१९ नुसार शिक्षक संवर्गातून थेट भरतीसाठीच्या सर्व पदांसाठी केंद्रीय शैक्षणिक संस्थांनांमध्ये आरक्षण दिलं जातं असून हा कायदा लागू झाल्यानंतर कुठलंही आरक्षण रद्द केलं जाणार नाही, असे शिक्षण मंत्रालयानं ट्विट केलं आहे.

India Alliance । इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का! नितीश कुमार यांच्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय

तसेच शिक्षण मंत्रालयाकडून २०१९ च्या अधिनियमानुसार रिक्त पदं भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत जेएनयूच्या विद्यार्थी संघटनांनी युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांच्याविरोधात सोमवारी निषेध आंदोलन करण्याची घोषणा केली होती.

OBC Meeting । मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ आक्रमक, बैठकीत घेतला मोठा निर्णय

Spread the love