Article 370 Verdict । जम्मू काश्मीरला (Jammu and Kashmir) विशेष दर्जा देणारे ३७० कलम (Article 370) रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेचा निकाल आज लागला आहे. सप्टेंबरमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षेताखाली सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) पाच सदस्यीय पीठानं सलग १६ दिवस सुनावणी घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Latest Marathi News)
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडून तीन निकाल दिला आहे. यातील एक निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. गवई व न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी दिला असून न्यायमूर्ती कौल यांनी स्वतंत्र निकाल दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी दोन्ही निकालांशी सहमती दर्शवली आहे. कलम ३७० (SC Verdict on Article 370) हटवण्यासाठी राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करणे आम्ही चुकीचे मानत नाही, असं म्हणत न्यायालयाने राष्ट्रपतींचा आदेश वैध मानला आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट, या दिवशी होणार सभागृहात चर्चा
तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आणि त्यानंतर मुदतवाढ देणे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही. याचिकाकर्त्यांनी त्यासंदर्भात आव्हान दिले नसल्याने याबाबत निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिवाय, जम्मू-काश्मीरचा समावेश भारतीय संघराज्यात करतेवेळी राज्याला अंतर्गत स्वायत्तता नव्हती, असे न्यायालयाने नमूद केलं आहे.
Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती