School Bus Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणातील महेंद्रगडमधील कनिना या ठिकाणी उनहनी गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या ठिकाणी शाळेची बस उलटून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये पाच मुलांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्यामुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर बस चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Pune Crime । पुण्यात नेमकं चाललंय काय? आधी समोस्यात कंडोम, आता बर्फाच्या लादीत….
पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेले आहे. हा अपघात झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघाताबाबत अधिकचा तपास आता पोलिस यंत्रणा करत आहे.
Congress । ब्रेकिंग! काँग्रेसने जाहीर लोकसभेची तिसरी यादी; या नेत्यांना मिळाली संधी