दीड महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळा सुट्टीनंतर आज राज्यातील शाळा (school) सुरू होत आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा आज सुरू होत आहेत. अनेक शाळांमध्ये शालेय व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांच्या (student) स्वागतासाठी अनोखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडूनही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
कोलकाता विमानतळावर भीषण आग, प्रवाशांची उडाली तारांबळ
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घ्या. यशस्वी व्हा, अशा शब्दांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थी राज्याचे भविष्यातील नेतृत्व आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्त्यांस शिंदे गटात प्रवेश
राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले आहे. एकाच पुस्तकामध्ये सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान देण्यासाठी, शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकार यांनी दिली.
कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो.विद्यार्थ्यांनी कष्टाची महती समजून घ्यावी. माणुसकी जपावी. चांगला अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवावा. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. तरुण देश म्हणून जगाला चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी जगाचे दूत म्हणून सेवा देण्याकरिता तयार व्हावे, असा सल्ला दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
Ajit Pawar । अजित पवार यांना मोठा धक्का! जवळच्या विश्वासू नेत्याने केला ‘बीआरएस’मध्ये प्रवेश