Wheat Variety । शास्त्रज्ञांनी तयार केले गव्हाचे 3 वाण, 150 दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन

Scientists have created 3 varieties of wheat, will get a huge yield in 150 days

Wheat Variety । भारत (India) हा जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक (Wheat grower) देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील कृषी उत्पादकता वाढावी यासाठी हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 1960 सालापासून देशातील गव्हाच्या उत्पादनात 1,000 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात गव्हाच्या वेगवेगळ्या जातींचे उत्पादन घेतले जाते. (Latest Marathi News)

Talathi Bharti । तलाठी भरतीच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ! परीक्षेच्या सर्व्हरमध्ये बिघाड

अशातच आता शास्त्रज्ञांनी गव्हाच्या प्रगत 3 जातींचा शोध लावला आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे या वाणांपासून गव्हाचे भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या वाणांना कोणत्याही रोगांचा धोका नसेल. या नवीन वाणांची शेतकऱ्यांनी लागवड केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

Viral Video । धबधब्याखाली आंघोळ करणे बेतले जीवावर, अंगावर पडला ढिगारा; पहा धक्कादायक व्हिडिओ

नुकतेच ICAR-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा यांनी अशा DBW-370 (करण वैदेही) DBW-371 (करण वृंदा) आणि DBW-372 (करण वरुणा) तीन नवीन बायोफोर्टिफाइड जाती विकसित केल्या आहेत. शेतकरी त्यांची लागवड करून चांगले उत्पादन घेऊ शकतील.

Politics News | “प्रत्यक्षात मात्र हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला”, दिलीप वळसे-पाटलांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे खरमरीत उत्तर

DBW- 370 (करण वैदेही)

गव्हाच्या या जातीच्या उत्पादनाची क्षमता 86.9 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या झाडाची उंची 99 सेमी असून परिपक्व होण्यासाठी एकूण 150 दिवसांचा कालावधी लागतो. या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12%, जस्त 37.8 पीपीएम तसेच लोहाचे प्रमाण 37.9 पीपीएम इतके आहे.

Weather Update । पुन्हा पावसाचे थैमान! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

DBW-371 (करण वृंदा)

ही जात दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशातील उना, पोंटा व्हॅली, जम्मू आणि कठुआ आणि उत्तराखंडमधील तराईमध्ये घेतली जाते. उत्पादन क्षमता 87.1 क्विंटल प्रति हेक्टर आहे. याची उंची 100 सेमी असून परिपक्व होण्यासाठी कालावधी 150 दिवस आहे. याच्या 1000 दाण्यांचे वजन 46 ग्रॅम असून या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १२.२ टक्के, जस्त 39.9 पीपीएम तसेच लोह 44.9 पीपीएम इतके आहे.

तुमच्या गावात कोणी जमीन खरेदी केली आणि कोणी विकली? एका मिनिटात समजणार, जाणून घ्या कसं ते?

DBW- 372 (करण वरुणा)

या जातीची उत्पादन क्षमता 84.9 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या झाडाची उंची 96 सेमी आहे. परिपक्व होण्यासाठी 151 दिवस लागतात. या जातीची झाडे 96 सें.मी.ची असतात. तर 1000 दाण्यांचे वजन 42 ग्रॅम पर्यंत असून या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12.2%, जस्त 40.8 पीपीएम आणि लोहाचे प्रमाण 37.7 पीपीएम पर्यंत असते.

Animal Husbandry Business : ‘ही’ गाई देते 800 लिटर दूध, जाणून घ्या नेमकी काय आहे खासियत?

Spread the love