मुंबई : मागच्या दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके जमीदोस्त झाली आहेत. त्यामुळे भाजीपाल्यांचे (vegetables) दर गगनाला भिडलेत.
सध्या पितृपक्षाचे दिवस चालू असल्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याला मागणी वाढत आहे. गवार आणि दोडक्याचे दर शंभर च्या पुढे गेले आहेत. तसेच टोमॅटो (tomato) देखील चाळीस रुपयांपेक्षा महाग झालेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने शेतकरी (farmer) आनंदात दिसत आहेत तर ग्राहक (customer) नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळतय. येणाऱ्या दोन महिन्यापर्यंत भाजीपाल्याचे दर असेच कडाडले राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Aditya Thackeray: रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
भाजीपाल्यांमध्ये गवार, दोडके यांनी तर शंभरी पार केली आहे. त्याचबरोबर वांगी 60 रुपये किलो, बटाटा, फ्लॉवर, कोंबी 30 रुपये किलो तर भेंडीचे 80 रुपये किलो दर झाले आहेत. शेवगा 300 रुपये किलो, दोडका आणि गिलके 100 रुपये किलो, गवार 160 रुपये किलो, श्रावण घेवडा सुद्धा 100 रुपये किलोवर पोहचला आहे. भाजीपाल्याच्या वाढत्या भावामुळे शेतकरी सध्या आनंदित आहेत.
Ajit Pawar: अजित पवारांना मुख्यमंत्री करा, ‘या’ खासदाराने केली मागणी