‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रचंड गाजलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आनंद दिघे यांच्या कार्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी या चित्रपटावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत.
काटामारीला बसणार आळा; साखर आयुक्तांनी कारख्यान्यांना दिले ‘हे’ आदेश
या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतरच करण्यात आली होती. परंतु, दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्यापही काही माहिती देण्यात आली नाही. मात्र या भागाचे शूटिंग सुरू झाल्याचे संकेत प्रसाद ओक याने नुकतेच दिले आहेत.
सरकारची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार
प्रविण तरडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना प्रसाद ओकने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रविण तरडेसोबतचा शूटिंग मधील फोटो पोस्ट केला असून सोबत ” प्रिय प्रविण. वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा.!!! माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी #धर्मवीर च्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुझ्या सर्व कलाकृतींना भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!!!” असा संदेश लिहिला आहे.
ज्वारीचे दर भिडले गगनाला, ‘इतका’ मिळतोय दर; पाहा सविस्तर
यावरून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाल्याचे कळून येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन चित्रपट संपतो. यामुळे दुसऱ्या भागात या प्रश्नाचे उत्तर मिळेल का ? अशी उत्सुकता लोकांमध्ये लागून राहिली आहे.
बिर्याणी आणण्यास उशीर झाला म्हणून तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारले; वाचा सविस्तर