Site icon e लोकहित | Marathi News

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

Second phase of cabinet expansion soon; The names of 'these' leaders of BJP are in discussion

राज्यात राजकीय भूकंप येऊन गेल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे मोठे प्रश्नचिन्ह या सरकारसमोर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्टला पार पडला. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

ऊसाचे पाचट न जाळता तयार करा सेंद्रिय खत; ‘असा’ होतो फायदा

पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारमधील बहुतेक मंत्री नाराज होते. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात या मंत्र्यांची नाराजी दूर करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर 23 मंत्री दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या 10 मंत्र्यांचा तर भाजप पक्षातील 13 मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारासाठी भाजपकडून संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा या तिघांची नावे चर्चेत आहेत. मागच्या वेळी 15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ 26 जानेवारीच्या अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थेट जर्मनीहून कांदे लावण्यासाठी महिला आली भारतात; पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version