Site icon e लोकहित | Marathi News

Section 144 In Pune । पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात लागू केले १४४ कलम, नेमकं प्रकरण काय?

Section 144 In Pune

Section 144 In Pune । पुणे : पुणेकरांसाठी (Pune) आता एक अतिशय महत्वाची बातमी आहे. पुणे पोलीस (Pune Police) प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आले असून शहरात कायदे, नियम आणि न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. नुकतीच या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक आणि चालक यांची बैठक झाली आहे. (Latest marathi news)

Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

३१ मार्चपर्यंत शहरात कलम १४४ लागू राहील, याची नोंद पुणेकरांनी घ्यावी. इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली आहे. तसेच अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर चालू ठेवले तर कठोर कारवाई करणार असे सांगितलं होतं.

Ajit Pawar । अजित पवार गटाला भलं मोठं भगदाड; ‘त्या’ 137 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद केले जात असून पुणे पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Asim Sarode । बिग ब्रेकिंग! शिंदे गटाच्या आमदारांनी केला एअर हॉस्टेसचा लैंगिक अत्याचार, असीम सरोदेंचा गंभीर आरोप

Spread the love
Exit mobile version