मागील तीन-चार दिवसांत सोशल मीडियावर आयपीएलमध्ये (IPL) सोमवारी (ता.१ मे) झालेल्या सामन्यातील वादाची चर्चा सुरू आहे. RCB आणि LSG यांच्यात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंची तुफान वादावादी झाली. या सामन्यामध्ये विराट कोहली चक्क चार खेळाडूंसोबत भिडला होता. यामध्ये गौतम गंभीरचा सुद्धा समावेश होता.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतम गंभीरला पाहिल्यानंतर चाहते जाणूनबुजून ‘कोहली-कोहली’चे नाव घेऊन चिडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
खुशखबर! आता व्हॉट्सअपवर मिळणार १० लाखांपर्यंतचे कर्ज; कस ते घ्या जाणून…
या व्हायरल व्हिडिओमध्ये, जेव्हा गंभीर ‘कोहली-कोहली’ हे नाव ऐकतो, तेव्हा लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक त्या चाहत्यांकडे संतापलेला दिसतो. या व्हिडिओवर चाहत्यांच्याही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. लखनऊ आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर गंभीरच्या रागाचा व्हिडिओ समोर आला आहे.
गांजाच्या नियंत्रित शेतीसाठी प्रयत्न सुरू; ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय…