Seema Haider Case । मागच्या काही दिवसापासून सीमा हैदर हे प्रकरण खूप चर्चेत आहे. प्रेमासाठी बेकायदेशीरपणे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. सीमाने तिचा प्रियकर सचिन याच्यासोबत लग्न केले असून आता ती आपल्या मुलांसह नोएडा येथे राहत आहे. मागच्या काही दिवसापासून माध्यमांसमोर देखील सीमा हैदर खूप चर्चेत आहे. मात्र या चर्चेचा आता सचिनला मोठा फटका बसला आहे. (Latest Marathi News)
Ajit Pawar । एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार कोण? ‘या’ कलाकाराचा मोठा सवाल
सचिनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडण्याची सचिनच्या परिवाराच म्हणणं आहे. सचिनची नोकरी देखील गेली असून आता खाण्यापिण्याच्या देखील समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. देशभरात गाजलेल्या या प्रकरणामुळे आता हे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडल आहे. सचिनच्या वडिलांनी पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कुटुंबाला खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. सध्या हे कुटुंब पोलिसांची मदत घेत आहे. इंडिया टुडे ने याबाबत वृत्त दिले आहे. (Seema Haider Case)
सीमाची चौकशी सुरूच
सीमाने पाकिस्तान सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि ती भारतात आली. सचिनसोबत तिने लग्न देखील केले यावेळी सीमा हैदरला 4 जुलै रोजी पोलिसांनी पकडलं आणि तेव्हापासून तिला सुरक्षा यंत्रणाच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे सीमा हैदरची कसून चौकशी देखील केली जात आहे. सध्या सीमा हैदर जामिनावर बाहेर आहे.