Seema Haider । सीमा हैदर लवकरच तुरुंगात जाणार? पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत; समोर आली धक्कादायक माहिती

Seema Haider going to jail soon? Police preparing to file charge sheet; Shocking information came to light

Seema Haider । मागच्या काही दिवसापासून पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात पळून आलेल्या सीमा हैदरची सगळीकडे चर्चा होत आहे. सीमा हैदर सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. सीमा हैदर बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार त्याचबरोबर सीमा हैदर निवडणूक देखील लढवणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसापासून होत आहेत. मात्र आता सीमा हैदरच्या अडचणी आणखी वाढू शकतात. सीमा हैदर प्रेमासाठी भारतात आल्याचा दावा करत असली तरी तिच्यावर संशयाची सुई कायमच आहे. सीमा हैदरचा दहशतवादी संघटनेची संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुखावर हल्ल्याचा प्रयत्न,अज्ञात मारेकऱ्यांनी चेहऱ्याला कापड बांधले आणि..

सध्या पोलिसांकडून सीमा आणि तिचा पती सचिन मीना या दोघांचाही अधिकचा तपास सुरू आहे. नोएडा पोलीस आणि उत्तर प्रदेशत एटीएस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सीमाच्या अडचणी अजून वाढू शकतात, लवकरचा सीमा हैदर प्रकरणात महत्त्वाच्या अहवाल हाती येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ajit Pawar । मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आता स्टॅम्पवर लिहून द्यायचं का?”

नोएडा पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत

नोएडा पोलिसांचा सीमा हैदरविरुद्धचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सीमाने पाकिस्तानातून भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी नोएडा पोलीस लवकरच न्यायालयात आरोप पत्र दाखल करू शकतात. सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतामध्ये पोहोचली आहे त्यामुळे नोएडा पोलीस पूर्ण तपास करून न्यायालयामध्ये आरोप पत्र दाखल करण्याचा देखील तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Sarfaraz Khan Marriage । सामना पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला IPL चा स्टार खेळाडू, गुपचुपच केलं लग्न

दरम्यान, जर सीमाचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसी जर काही संबंध असेल असा जर पोलिसांना संशय आला तर तिला पुन्हा एकदा तुरुंगात जावे लागेल त्याचबरोबर सीमासोबत तिला मदत करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्या सचिनला देखील तुरुंगात जावं लागेल अशी माहिती समोर येत आहे.

Havaman Andaj । विदर्भातील शेतकरी संकटात! ‘या’ पाच जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा

Spread the love