सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवले नाहीतर २६/११ सारखा हल्ला केला जाईल; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन

Seema Haider sent to Pakistan or else attack like 26/11; Mumbai Police received a threatening call

जर सीमा हैदरला (Seema Haider) पाकिस्तानला (Pak) पाठवले नाहीतर पुन्हा मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्यात येईल, अशी धमकी मुंबई पोलिसांना फोनवरून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात (Mumbai Traffic Control Room) खूप मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, मुंबई पोलिसांना (Mumbai Police) उर्दू भाषेत ही धमकी दिली आहे. या कॉलरने पुढे अशीही धमकी दिली आहे की भारताला २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहावे लागणार आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar | अजित पवार यांची वंदे भारत ट्रेनमध्येही क्रेझ कायम, कार्यकर्त्यांनी केली प्रचंड गर्दी

जर असे झाले तर याला उत्तर प्रदेश (UP) सरकार जबाबदार असणार असेही स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून या कॉलची चौकशी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांना यापूर्वी असे अनेक धमकीचे फोन आले आहेत. सीमा हैदर ही पाकिस्तानातील (Pakistan) सिंध प्रांतातील जैसमाबादमधील रहिवासी असून तिने २०२० साली PUBG गेमद्वारे ग्रेटर नोएडाच्या जेवर येथे राहत असणाऱ्या सचिनशी मैत्री केली.

Maharashtra Rain । राज्यात पुन्हा २४ तासांचा येलो अलर्ट जारी! पुणे, मुंबईसह २६ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

त्यानंतर या दोघांनी या वर्षी मार्चमध्ये नेपाळमध्ये लग्न केले. ती १२ मे रोजी नेपाळमार्गे भारतात सचिनच्या घरी आली. परंतु सीमाला बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याने नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याशिवाय सचिनला अटक करण्यात आले होते. दोघेही सध्या कोर्टातून जामिनावर सुटले आहेत. त्यानंतर सीमाने जर तिला पाकिस्तानला परत पाठवले तर तिच्या जीवाला धोका निर्माण होईल. त्यामुळे सीमाने भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती योगी सरकारकडे केली आहे.

स्वस्तात मस्त! भारतातील बेस्ट बजेट स्मार्टफोन्सची यादी पाहा एका क्लिकवर

Spread the love