
दिल्ली: राजधानी दिल्लीत (Delhi) एका 11 वर्षीय मुलीवर शौचालयात झालेल्या सामूहिक बलात्काराची (Gang rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानीतील शाळाही मुलांसाठी सुरक्षित नाहीत, हे दुर्दैवी आहे. घटना अशी घडली की, दिल्लीत एका केंद्रीय विद्यालयाच्या (school) शौचालयात एका 11 वर्षीय मुलीवर (11years girl) दोन ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शौचालयात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस (Delhi police) अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. तसेच केंद्रीय विद्यालय संघटनेच्या विभागीय कार्यालयाने देखील या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने मंगळवारी तक्रार दाखल केली आणि तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना जुलै महिन्यात घडली आहे. दरम्यान दिल्ली महिला आयोगाने (DCW) प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पीडितेने मंगळवारी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी डीसीडब्ल्यूने दिल्ली पोलिस आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. इतकंच नाही तर शाळेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावतीने या घटनेची माहिती पोलिसांना का देण्यात आली नाही, याचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान दुसरीकडे केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेने किंवा तिच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती दिली नव्हती. हे प्रकरण पोलिस तपासानंतरच उघडकीस आले.
डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, आम्हाला दिल्लीतील एका शाळेत 11 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समजली. दरम्यान पिडीत मुलीने हे प्रकरण शाळेतील शिक्षकाने दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, असेही मालीवाल म्हणाले.
दिल्ली महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, जुलैमध्ये ती तिच्या वर्गात जात असताना तिची 11वी आणि 12वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांशी टक्कर झाली. त्यावेळी तिने मुलांची माफीदेखील मागितली. परंतु त्या दोन मुलांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तिला शौचालयात नेले. टॉयलेटचा दरवाजा आतून बंद करून मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. जेव्हा मुली या घटनेची संपूर्ण माहिती शाळेतील एका शिक्षिकेला सांगितली. तेव्हा तिला सांगण्यात आले की मुलांना शाळेतून बाहेर काढण्यात आले. दरम्यान हे प्रकरण इथच दाबण्यात आले.
T20 World cup स्थान न मिळाल्याने टीम इंडियाच्या ‘या’ स्टार बॉलरचं आता एकच लक्ष्य
केव्हीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी शाळा प्रशासनाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. केव्हीएसचे प्रादेशिक कार्यालय याची चौकशी करत आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या घटनेची माहिती मुलीने किंवा तिच्या पालकांनी दिलेली नाही. दरम्यान या घटनेनंतर झालेल्या पालक-शिक्षक बैठकीत (पीटीएम) हा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. पोलीस तपासानंतरच ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Eknath Shinde: सीएम शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणं भोवलं, 8 शिवसैनिकांची जेलमध्ये रवानगी
डीसीडब्ल्यूने या घटनेबाबत पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईत आम्ही सहकार्य करत आहोत. सविस्तर तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडितेच्या जबाबाच्या आधारे शिक्षक व संशयित विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली महिला आयोगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना या प्रकरणाची त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकरणी केलेल्या चौकशीच्या अहवालाची प्रतही शाळेला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान महिला आयोगाने दिल्ली पोलिस आणि शाळेच्या शिक्षक आणि इतर कोणत्याही कर्मचार्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची तक्रार न केल्याबद्दल केलेल्या कारवाईची माहिती देण्यास सांगितले आहे.