बारामती येथील एका डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. गोपाळ तुकाराम गायकवाड (रा. प्रतिभानगर, बारामती) यांनी ही तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने व बाळाच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला असल्याचे सांगितले आहे. डॉ. तुषार गोविंद गदादे ( Dr. Tushar Gadade) यांच्यावर हा आरोप करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी बाळाच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
बिग ब्रेकिंग! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडली
या प्रकरणाबाबत बारामतीचे (Baramati) उपविभागीय अधिकारी व पोलिस निरिक्षकांकडे डॉ.तुषार गदादे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार गोपाळ गायकवाड यांच्या पत्नीला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने त्यांना डॉ. तुषार गदादे यांच्या दवाखान्यात दाखल केले होते. यावेळी डॉ. गदादे यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रसूती करावी लागेल असे कुटुंबियांना सांगितले होते. दरम्यान कुटुंबियांनी देखील डॉक्टरांना सिझर करण्यासाठी मान्यता दिली होती.
कुत्र्याच्या एका चुकीमुळे मालकाचे नुकसान! संपूर्ण घर जळून खाक
परंतु, यानंतर डॉक्टर लगेचच एका कार्यक्रमासाठी निघून गेले. यावेळी रुग्णाची प्रकृती बिघडली व बाळाचे पाय देखील बाहेर आले होते. मात्र वेळेत उपचार करण्यासाठी डॉक्टर न्हवते. दरम्यान वेळेत उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यु झाला. यामुळे संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार केली आहे. मात्र डॉक्टरांनी हे आरोप फेटाळले असून आम्ही कर्तव्यात कसूर केली नाही असे सांगितले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.