दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातील सात मृतदेह आढळले होते. यामध्ये कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना नक्की अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित राहिला असून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली. आता ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. कौटुंबिक वादातून सात जणांची हत्या झालाचं म्हटलं जातंय.
शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपट अखेर आज रिलीज!
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले पवार कुटुंब हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधील आहे. या घटनेला आत्महत्या म्हंटल जात होत. मात्र मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नाही हत्या असा आरोप केला होता.
मेडिकलला आग लागून आगीत लाखो रुपयांची औषधं जळून खाक!
यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चांगलीच चौकशी केली. यावर आता मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आला आहे. त्यावरुन चार जणांवर गुन्हा नोंद करुन अटक देखील करण्यात आली आहे.
गाडीवर स्टंट करत तरुणीला केले प्रपोज; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
दरम्यान, हे मृतदेह एकाच दिवशी सापडले नसून टप्प्याटप्प्याने सापडले आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.