Ajit Pawar Birthday । मुंबई : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सहकारी नेत्यांसोबत शिवसेना पक्ष (Shivsena) फोडला. अशातच या घटनेला वर्ष झाले नाही तोपर्यंतच अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सहकारी नेत्यांसोबत राष्ट्रवादी (NCP) फोडली. विरोधी पक्षनेतेपदावर असलेले अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही घटनेमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे.
दरम्यान, आज अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले आहेत. अनेक जाहिरातींमध्ये शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी शरद पवार यांनी आपला फोटो न लावण्याचे आवाहन केले होते, तरीही अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला आहे. दरम्यान, थोडक्यात राजकीय जाणून घेऊयात अजित पवार यांच्या कारकीर्दीचा आढावा.
Tourist Places । पर्यटकांनो.. फिरायला जात असाल तर थांबा, ‘या’ पर्यटनस्थळांवर आहे बंदी
- 1991 साली अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. परंतु त्यांना तीन- चार महिन्यातच त्यांना खासदारकीवर पाणी सोडावे लागले. त्यानंतर ते सातवेळा आमदार झाले.
- 1993 साली अजित पवार ऊर्जा खात्याच्या राज्यमंत्रिपदावर विराजमान झाले.
- 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी अजित पवार पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री झाले.
- 2004 साली अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. त्याशिवाय 2004 ते 2009 सालापर्यंत त्यांच्याकडे जलसंपदा खातं तर 2009 ते 2010 या काळात जलसंपदा आणि ऊर्जामंत्रिपद त्यांनी भूषवलं. पुढे ते 2010 ते 2014 या काळात उपमुख्यमंत्री तसेच वित्त नियोजन आणि ऊर्जामंत्रिपदावर कायम राहिले.
- 2019 साली त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु अवघ्या 80 तासातच त्यांनी राजीनामा दिला.
- 2019 ते 2022 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद भूषवले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला पण सध्या ते शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.