अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा; मात्र पीएम किसान योजनेची रक्कम वाढली का? जाणून घ्या सविस्तर

Several announcements for farmers in the budget; But has the amount of PM Kisan Yojana increased? Know in detail

आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये सामन्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी ( Agriculture sector) विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून चालू होत्या. आता यामध्ये वाढ झाली आहे की नाही हे पाहुयात.

नवीन अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले ‘हे’ धडाकेबाज निर्णय; वाचा एका क्लिकवर

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये मिळतात. मात्र या हप्त्याच्या रकमेत बदल करून रक्कम वाढणार चर्चा सुरु होत्या मात्र, याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 6 हजार रुपये हप्ता मिळत राहील.

यंदाच्या अर्थसंकल्प बजेटमध्ये स्वस्त झाल्या ‘या’ गोष्टी; वाचा सविस्तर

अर्थसंकल्पात भर देण्यात आलेली 7 उद्दिष्टे

1) पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
2) विकासपट सर्वसमावेशक करणे
3) खऱ्या अर्थाने क्षमतांचा वापर करणे
4) हरितविकास ( Green Development)
5) युवकांचे सामर्थ्य
6) आर्थिक क्षेत्र उंचावणे
7) सर्व व्यक्तींना लाभ देणे

मोठी बातमी! दुगधव्यवसायसाठी अर्थसंकल्पात २० लाख कोटींची तरतुद

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

1) अगामी काळात कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे शेती स्टार्टअपना प्रोत्साहन मिळणार आहे.
2) भरड धान्याचे उत्पादन, त्याची विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार.
3) देशात नवीन 157 नर्सिंग कॉलेज स्थापन होणार.
4) लहान व किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन होणार.
5) जेष्ठ नागरिकांना बचत योजनेवर सुविधा मिळणार
6) पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढला.
7) पायाभूत सुविधांसाठी निधीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ
8) देशात 50 नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत.

नवीन अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात उसळी; मात्र ‘ती ‘घोषणा होताच ‘या’ कंपन्यांचे शेअर्स आपटले!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *