सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे. या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. य प्रकरणातील आरोपी मनोज साने देखील धक्कादायक खुलासे करत आहे. आत्तापर्यंत या आरोपीने एवढे मोठे खुलासे केले आहे ते ऐकून पोलीस देखील चक्रावले आहे.
आरोपी मनोजनेच सरस्वती हिची हत्या केली का? याचा शोध लावणे पोलिसांसमोर एक आव्हानच बनलं आहे. आरोपी मनोजने काही खुलासे करत पोलिसांना भटकवण्याचा देखील प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाबाबत दररोज काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे. ज्या इमारतीमध्ये सरस्वतीची हत्या करण्यात आली, त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 35 मृतदेहाचे तुकडे सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.
बापरे! बदला घेण्यासाठी पत्नीने ओतले पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल
हे सर्व तुकडे सरस्वतीचेच असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. सरस्वतीच्या मृतदेहांच्या तुकड्यांचा डीएनए आणि सरस्वतीच्या बहिणीची डीएन चाचणी करण्यात आली होती. याचा रिपोर्ट आला असून त्या दोघींचा DNA जुळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपीने सरस्वतीच्या हत्येची आधीच तयारी केली होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. त्याचबरोबर त्याचे अनेक महिलांशी देखील संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
Kangana Ranaut। कंगना रणौतने केला मोठा खुलासा; म्हणाली, “लग्न करायची इच्छा आहे पण…”