पुण्यातील ‘बुधवार पेठ’ हा आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया (Red Light Area) समजला जातो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय केला जातो. दरम्यान पुण्यातील इतर भागात पण वेश्या व्यवसाय होत असल्याचे उघड होत आहे. नुकतीच पुणे (pune) शहरातील वेश्या व्यवसायाप्रकरणी ( Prostitution) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये अडकलेल्या एका अभिनेत्री व मॉडेलला सोडविण्यात पोलिसांना यश आले असून तीन दलालांना अटक करण्यात आली आहे.
राजकीय घडामोडींचा वेग! शरद पवारांच्या घरी आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी हा वेश्याव्यवसाय उघड केला आहे. एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकल्याने हे सेक्स रॅकेट उघड झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला होता. या ग्राहकाने दलालशी संपर्क करून हॉटेलमध्ये रूम बुक केले होते. बनावट ग्राहक घटनास्थळी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
Dharmveer Movie | ‘धर्मवीर’ चा दुसरा भाग लवकरच! वर्षपूर्ती निमित्त प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
याठिकाणी एका भोजपुरी अभिनेत्रीला व मॉडेलला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात आहे. असे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रबीर मुजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी महिलांना फसवून त्यांना मोठ्या रकमेचे आश्वासन देत होते. या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत ? ग्लॅमर इंडस्ट्रीमधील आणखी लोकांचा यामध्ये सहभाग आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
सर्वात मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? काय असेल नवीन नाव?