छत्तीसगड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आजपर्यंत आपण भ्रष्टाचार करणारे सरकारी अधिकारी पाहिले आहेत. मात्र या ठिकाणी एका अधिकाऱ्याने महिलांचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचे समोर आले आहे. जात प्रमाणपत्र काढताना ( Caste Certificate) बॉडी टेस्टिंगच्या (Body testing) नावाखाली मुली व महिलांचे कपडे काढून अश्लील फोटो काढण्याचा प्रकार याठिकाणी होत होता. दरम्यान अजूनही या व्यक्तीवर कारवाई झालेली नाही.
Smuggling of gold । १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; ‘या’ देशांतील महिलांचा समावेश
छत्तीसगड जिल्ह्यातील सुरजपुर मधील गेत्रा गावातील ग्रामपंचायतीमध्ये हा आरोपी काम करत होता. याठिकाणी जातप्रमाणपत्र काढण्याच्या नावाखाली त्याने अल्पवयीन मुली व महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. एका लहान मुलीच्या सांगण्यावरून हा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीचे जातप्रमाणपत्र काढण्यासाठी तिचे वडील तिला ग्रामपंचायत मध्ये घेऊन गेले होते.
मारहाणीच्या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाल्या, “फक्त एक…”
याठिकाणी गेल्यानंतर मुलीच्या वडिलांना साक्षीदारांच्या सह्या आणण्याच्या बहाण्याने गावात पाठविण्यात आले. त्यानंतर त्या मुलीचे कपडे काढून व्हिडिओ व फोटो काढले गेले. दरम्यान ही बाब मुलीने आपल्या वडिलांच्या कानावर घातली. घटनेबाबत माहिती मिळताच वडिलांना त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तेथे महिला पोलीस अधिकारी नसल्याने या प्रकरणाकडे पाठ फिरवण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे गावातील इतर महिलांच्या बाबतीत देखील हा प्रकार घडला आहे.