PM Modi Birthday: शाहरुख खान ने मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाला…

Shah Rukh Khan wishes Modi on his birthday! said

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगेवेगळ्या क्षेत्रातील लोक शुभेच्छा देत आहेत. यामध्ये कलाकार मंडळी देखील मोदींवर शुभेच्छांचं वर्षाव करत आहे. अजय देवगण, विवेक अग्निहोत्रीसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनीसुद्धा नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. आता यामध्येच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानने ट्विट करत मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख ने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आपल्या देशाच्या आणि त्यातील लोकांच्या कल्याणासाठी तुमचे समर्पण खूप कौतुकास्पद आहे. आपली सर्व उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला अधिक शक्ती आणि आरोग्य लाभो. एक दिवस सुट्टी घ्या आणि आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या, सर. वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

शाहरुख खानची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *