शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपट अखेर आज रिलीज!

Shah Rukh Khan's much-loved film Pathan finally released today!

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित पठाण (Pathan) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते तो अखेर आज रिलीज झाला आहे. देशातील अनेक थिएटर्स हाऊसफुल्ल देखील झालेत. मुंबईसह पुण्यातील थिएटर्सच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मागच्या काही दिवसापासून हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणताही धुडगूस घालू नये, थिएटर्सच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

मेडिकलला आग लागून आगीत लाखो रुपयांची औषधं जळून खाक!

मंबईच्या (Mumbai) पीवीआर ओबेरॉय (PVR Oberoi) थिएटरमध्ये 6-7 पोलीस अधिकारी असून 60 टक्के ऑक्यूपेसीबरोबर पठाणचा पहिला शो सुरू झालाय. मुंबईच्या थिएटर्समध्ये सकाळी 6 आणि 7 वाजताचे शो सुरू करण्यात आले असून दोन्ही शो हाऊसफुल्ल आहेत.

गाडीवर स्टंट करत तरुणीला केले प्रपोज; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

दरम्यान, हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच ४.१९ लाखांपेक्षा जास्त अँडवान्स बुकींग देखील झालेलं आहे. हा सिनेमा जवळपास ४० ते ५० कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी सिनेअभ्यासकांकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झाला आहे.

‘या’ नेत्याने घेतला सुप्रिया सुळेंच्या भोळेपणाचा फायदा! खोटे बोलून केली फसवणूक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *